रायफल शुटींग स्पर्धेत प्रियदर्शिनी त्रिपाठीस रौप्य पदक

ऑक्टोबर 9, 2025 5:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । येथील गोदावरी इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुलची विद्यार्थिनी प्रियदर्शनी त्रिपाठीस रायफल शूटिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळवत यश प्राप्त केले आहे. नाशिक येथे शालेय विभागीय स्पर्धेत रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन नाशिक येथे दिनांक ८ ऑक्टोंबर २०२५ रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Priyadarshini Tripathi

स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्रियदर्शनी त्रिपाठी ने १७ वर्षाखालील गटात अतिशय उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदक आपल्या नावे केल्याने शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे

या उत्कृष्ट यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील ,हृदय रोग तज्ञ डॉ .वैभव पाटील ,स्कूलच्या प्राचार्या सौ नीलिमा चौधरी,यांनी तसेच, सर्व शिक्षकवर्ग व क्रीडा मयूर पाटील व ममता प्रजापत यांनी अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now