सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा केला वळता; लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार

ऑक्टोबर 9, 2025 12:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२५ । महायुतीच्या बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. योजना सुरु झाल्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंतचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. मात्र, आता ऑक्टोबर महिना उजाडला तरी सप्टेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळालेला नाहीये. अशातच लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी समोर आलीय

ladki bahin

ती म्हणजे लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा वळता करण्याबाबतचा शासन निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. या निर्णयानुसार, लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाअंतर्गत ३९६० कोटी इतका नियतव्यय मंजूर केला आहे.

सामाजिक न्याय विभागाने निधी मंजूर करताना महिला व बालविकास विभागाला महत्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत. या सूचनेनुसार अनुसूचित जातीच्या आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करुन देण्यात यावी. तसंच उपलब्ध करून दिलेल्या निधीचा वापर हा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी होईल याची दक्षता घ्यावी. विभागाअंतर्गत संजय गांधी निराधर योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हत्पा मिळणार नाही हे देखील लक्षाच घ्यावे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now