हातपंप व विजपंप देखभाल कर्मचाऱ्यांचा पगार व पेन्शन दिवाळीपूर्वी होणार; मंत्री गुलाबराव पाटलांची वचनपुर्ती

ऑक्टोबर 8, 2025 10:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२५ । ग्राम विकास व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय दि. 31.03.1978 व दि. 30.07.1981 नुसार हातपंप /विद्युतपंप देखभाल व दुरुस्ती योजनेची प्रशासकीय यंत्रणा ठरवुन जिल्हा परिषदेला कनिष्ठ अभियंता (यां) , हातपंप यांत्रिकी, विजतंत्री, मदतनीस या सवंर्गातील पदे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर मंजुर करुन ती भरण्यात येवून त्यांचे वेतन व भत्त्याचा खर्च जिल्हा परिषदेतील देखभाल व दुरुस्ती निधीतुन / ग्रा.प.कडील प्राप्त वसुलीतुन भागविण्यात येत होता.

gulabrao patil jpg webp

परंतु जिल्हा परिषदेच्या अत्यल्प उत्पन्नातुन सदरील कर्मचा-यांचा वेतन व भत्त्यांचा खर्च भागविण्यास आर्थिक अडचण निर्माण होत होती. त्यामुळे हातपंप /विजपंप देखभाल व दुरुस्ती कर्मचा-यांना हलाकीचे जीवन जगावे लागत होते. 40 वर्षापासुन प्रलंबित असलेला प्रश्न पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अथक प्रयत्नातुन जिल्हा परिषद अंतर्गत राज्यातील हातपंप/विजपंप देखभाल व दुरुस्ती करीता कार्यरत नियमित कर्मचा-यांच्या व नियमित पदावरुन सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या वेतन, व सेवानिवृत्ती वेतन व भत्त्यांचे दायीत्वाबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे, ५ जुलै २०२४ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या कर्मचाऱ्यांच्या तसेच नियमित पदांवरून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन व पेन्शनचे दायित्व शासनाने स्वीकारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

त्या अनुषंगाने एकुण 1074 हातपंप/विजपंप यंत्रणेतील कर्मचा-यांचे वेतन व सेवानिवृत्ती वेतनाचे दायीत्व शासनाने दिनांक 09 ऑगस्ट 2024 पासुन स्विकारलेले असून प्रथम टप्प्यात शासन निर्णय दिनांक 4 जुन 2025 अन्वये एकुण 32 जिल्हा परिषदेकरीता माहे मार्च ते मे-2025 पर्यतचा एकुण 920.30 लक्ष निधी वितरीत करण्यात आलेला होता. आता नुकतेच निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय दिनांक 7 ऑक्टोंबर 2025 अन्वये 1011.59 लक्ष निधी जिल्हा परिषदांना वितरीत करण्यात आलेला असून ठाणे, पालघर, रत्नागिरी, कोल्हापुर ,जालना, अमरावती जिल्ह्यांनाही लवकरच निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

“ग्रामीण भागातील पाणीपुरवठा टिकवण्यासाठी हातपंप आणि विजपंप कर्मचारी अहोरात्र मेहनत घेतात. अनेक वर्षांपासून ते आर्थिक अडचणीत होते. शासनाने त्यांचा प्रश्न सोडवून दिला आहे. दिवाळीपूर्वी प्रत्येक कर्मचाऱ्याला पगार व पेन्शन मिळेल; त्यांची दिवाळी आता खऱ्या अर्थाने प्रकाशमय होणार आहे.”

  • पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now