पतीचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह, पण पोलिसांनी रोहिणी खडसेंना चौकशीसाठी का बोलावलं?

ऑक्टोबर 6, 2025 4:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२५ । पुण्यातील खराडी येथे ड्रग पार्टी प्रकरणात शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना अटक झाली होती. यानंतर काही दिवसांपूर्वीच प्रांजल खेवलकरला न्यायालयाने जामीन मंजूर केला. याच दरम्यान पुणे पोलिसांनी रोहिणी खडसेंना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली होती. अमली पदार्थ विरोधी विभागाने त्यांची चौकशी केली. चौकशीत त्यांच्या जबाबाची नोंद करण्यात आली असून, या चौकशीनंतर रोहिणी खडसे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची देखील भेट घेतली.

rohini khadse pranjal khewalkar

दरम्यान ड्रग पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक अहवालात आला असून त्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आले की, प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थाचे सेवन केले नव्हते.त्यापूर्वी कोर्टाने प्रांजल खेवलकर यांना दिलासा देत जमीन मंजूर केला. यानंतर हे प्रकरण शांत होईल असे वाटत असतानाच आता या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये ‘सोनार’ नावाच्या व्यक्तीच्या नावे असलेले सिमकार्ड आढळले आहे. खेवलकर अटकेत असतानाच ‘सोनार’ या व्यक्तीने आपले सीम हरवल्याचा बनाव करत त्याच नंबरचे नवीन सीमकार्ड घेतले. हे सिम नवीन मोबाईलमध्ये टाकून व्हॉट्सॲपसह महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आला, असा गंभीर आरोप पुणे पोलिसांकडून करण्यात आला आहे.

पोलिसांच्या दाव्यानुसार, हे संपूर्ण कृत्य रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून केल्याची माहिती ‘सोनार’ या व्यक्तीने चौकशीत दिली असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. मात्र, ‘सोनार’ नेमका कोण आहे, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.या प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय असून, पुणे पोलिसांनी रोहिणी खडसे यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार आज (6 ऑक्टोबर) त्यांची अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून दीड तास सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांचा लिखित जबाब नोंदवण्यात आला.

दरम्यान या चौकशीनंतर रोहिणी खडसे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पोलीस मुख्यालयात भेट घेतली. ही भेट सुमारे 15 ते 20 मिनिटे चालली होती. यावेळी दोघांमध्ये कोणत्या विषयावरून बोलणे झाले हे मात्र अद्याप समोर आले नाही

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now