दिवाळीत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार सप्टेंबर-ऑक्टोबरचे 3000 रुपये?

ऑक्टोबर 6, 2025 4:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२५ । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जातो. मात्र, आता ऑक्टोबर महिना उजाडला तरी सप्टेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळालेला नाहीये. दरम्यान, आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार असल्याच्याही चर्चा सुरु आहे. याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ladki bahin

मागील अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते लांबणीवर जात आहेत. त्यामुळे या महि्याचाही हप्ता लांबणीवर गेल्याने काही आश्चर्य वाटत नाहीये. मात्र, अजूनही माहिती दिलेली नाही, त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान दिवाळी सणाच्या मुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे ३००० रुपये पात्र महिलांना दिले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकार दिवाळीचा मूहूर्त साधत पैसे देतील, अशी आशा महिलांच्या मनात आहे. दरम्यान, याबाबत आदिती तटकरे लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.

या महिलांनाच मिळणार सप्टेंबरचा हप्ता

लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. आता फक्त ज्या महिलांनी केवायसी केली आहे त्यांनाच सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य केले आहे. यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्याआधी महिलांनी केवायसी करण्याचे आवाहन आदिती तटकरेंनी दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now