लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी; e-KYC संदर्भात आणखी एक नियम लागू, आता..

ऑक्टोबर 1, 2025 12:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२५ । लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली असून आता या योजनेच्या केवायसीसंदर्भात अजून एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. आता या योजनेत लाभार्थी महिलांसोबतच त्यांच्या वडील किंवा पतीची केवायसीदेखील करावी लागणार आहे.

ladki bahin yojan

राज्य सरकारकडून राबविल्या जणाऱ्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट खात्यात मिळत आहे. मात्र या योजनेत अनेक गैरप्रकार समोर आल्यानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी देखील करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार, फसवणूक थांबवण्यासाठी सरकारकडून पडताळणी करण्यात येत आहे.

यासाठी सरकारने सर्व पात्र महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली असून त्यासाठी दोन महिन्यांची मुदत निश्चित केली आहे. तुम्हाला तोपर्यंत केवायसी करणे अनिवार्य आहे. अन्यथा तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाहीये. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अजून घटण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसीमधून अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आता महिलांच्या पती किंवा वडिलांचीही केवायसी केली जाणार आहे. त्यामुळे महिलांच्या पतीचे किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न किती आहे याचीही पडताळणी केली जाणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now