24 तासात चांदीत 3800 रुपयांची वाढ, सोनेही महागले; जळगावच्या सुवर्णपेठेत आताचे दर काय?

सप्टेंबर 28, 2025 10:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२५ । ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्यासह चांदीने दरवाढीची धूम ठोकली आहे. सलग तिसऱ्या दिवशी चांदी दराने मोठी उसळी घेतली. सततच्या दरवाढीमुळे जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दराने इतिहास रचला असून सोबतच सोन्याने देखील नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.

gold silver 1 jpg webp

गेल्या २४ तासात जळगावच्या सराफ बाजारात चांदी दरात तब्बल तीन हजार ८०० रुपयांची भाववाढ झाली. त्यामुळे जळगावच्या इतिहासात पहिल्यांदा चांदीचे दर विना जीएसटी १,४४,००० रुपयांवर पोहोचला. तर जीएसटीसह चांदी एक लाख ४८ हजार ३२० रुपयावर पोहोचली. सोन्याच्याही भावात ७०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख १४ हजार ६०० रुपयांवर पोहोचले. जीएसटीसह सोन्याचा एक तोळ्याचा भाव एक लाख १८ हजाराच्या वर गेला आहे.

दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीच्या भावात सतत वाढ होत आहे. अमेरिकेच्या धोरणाचाही परिणाम सोने-चांदीच्या भावावर होत असून, तीन दिवसांपासून सोन्यापेक्षा चांदीच्या भावात अधिक वाढ होत आहे. असं भंगाळे गोल्डचे संचालक आकाश भंगाळे यांनी सांगितले

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now