MPSC ने 28 सप्टेंबरच्या परीक्षेची तारीख बदलली ; ही आहे नवीन तारीख

सप्टेंबर 26, 2025 5:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२५ । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 28 सप्टेंबरला होणार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलली आहे. ही परीक्षा आता 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

mpsc jpg webp

यामागचं कारण म्हणजे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गांवाचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे.राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने पत्र क्रमांक मलोआ-1125/प्र.क्र.236/मलोआ, दिनांक 26 सप्टेंबर, 2025 अन्वये केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025, दिनांक 28 सप्टेंबर 2025 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 09 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येईल.महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे दिनांक 09 नोव्हेंबर, 2025 रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 चा सुधारित दिनांक शुद्धिपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now