गुन्हेजळगाव जिल्हा

अबब.. दाम दुप्पटच्या नावाखाली लावला पावणे दोन कोटींचा चुना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील एकाला २०१४ ते २०१९ दरम्यान एकाने विविध क्रमांकावर विविध नावाने संपर्क साधत तब्बल पावणे दोन कोटींचा चुना लावला. मार्च २०२० मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगावच्या सायबर सेलने तब्बल तीन दिवस सापळा रचून दिल्ली येथून एकाला अटक केली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील फिर्यादी वामन काशिराम महाजन यांना सन २०१४ ते २२/०२/२०१९ चे दरम्यान पंकज कुमार, हरबंसलाल, कविता, समीर मेहरा, शुक्ला, एस.पी. सिन्हा, रिया, मेहता असे नाव सांगणा-या अनोळखी इसमांनी इलेक्ट्रॉनीक साधनांद्वारे स्वतःची ओळख लपवुन फिर्यादीचे मोबाईल क्रमांक ७८८७९९९६८० यावर वेळोवेळी संपर्क करुन एसबीआय लाईफ इन्शुरन्स पॉलीसीला एजंट कोड व म्युच्युअल फंडचे माध्यमातुन पैसे डबल मिळतील असल्याचे भासवून इसमांनी वेळोवेळी फंड रिलीफ करण्यासाठी पैसे भरण्यासाठी असे नाव सांगणा-या अज्ञात इसमांनी स्वतःची ओळख लपवुन वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधुन फिर्यादीकडुन वेगवेगळया ३५ बैंक खात्यांमध्ये वेळावेळी १ कोटी ७३ लाख ८९ हजार ९४५ रुपये हे आरटीजीएस, एनईएफटीद्वारे ऑनलाईन स्विकारुन फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली म्हणुन मुक्ताईनगर पो.स्टे. येथे मार्च २०२० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा, जळगांव येथे तपासकामी वर्ग करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषन हे सायबर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, उपनिरीक्षक अंगत नेमाने, पोलीस नाईक दिलीप चिंचोले, गौरव पाटील, दिपक सोनवणे, अरविंद वानखेडे अशांनी केले आहे.

गुन्हयाच्या तपास केला असता आरोपी विकास कपुर रा.साधनगर, पालम गांव, दिल्ली व त्याचे साथीदार यांनी संगनमताने फिर्यादी वामन काशिराम महाजन यांचेकडुन फंड रिलीफ करण्यासाठी आमिष दाखवत पावणेदोन कोटी उकळले. रक्कम ऑनलाईन वळवून तसेच एटीएमद्वारे पैसे विड्रॉल केले आहे. त्यासाठी आरोपी विकास कपुर व त्याचे साथीदार यांनी बनावट नावाने मोबाईल सीम कार्ड घेवून त्याचा फसवणुक करण्यासाठी तसेच बनावट नावाने बँक खाते उघडुन त्यामध्ये फिर्यादी कडुन ऑनलाईन पैसे स्विकारुन ते पैसे विड्रॉल केले असल्याचे निष्पन्न झाले होते.

गुन्हयाचे तपासकामी पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे व अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी दिल्ली येथे पोलीस उपनिरीक्षक अंगत नेमाने, पो.ना/ दिलीप चिंचोले, पो.कॉ/गौरव पाटील, पोकॉ/दिपक सोनवणे, पोकॉ/ अरविंद वानखेडे यांची टिम दि.१० जून रोजी आरोपीच्या तपास कामी दिल्ली, गाझीयाबाद, नोयडा, पालम व्हिलेज येथे रवाना केली. टिमने तीन दिवस छडा लावत सापळा रचून, गुप्त माहिती काढत विकास सुरिंदर कपुर यास मोठ्या शिताफीने दि.१४ रोजी ताब्यात घेतले. त्यास दिल्ली येथील न्यायालयात हजर करुन ट्रांझीट रिमांड घेवून त्यास दि. १५ रोजी जळगाव येथे पथक पोहचले. त्यास दि.१६ रोजी मुक्ताईनगर न्यायालयात हजर करुन पोलीस कस्टडी मागीतली असता न्यायालयाने दि.२५ पावेतो पोलीस कोठडी दिली आहे.

जळगाव पोलीसांमार्फत नागरीकांनी कुठल्याही अज्ञात व्यक्तीला फोनद्वारे स्वत:ची व बँकेची वैयक्तीक माहीती सांगु नये व कुठल्याही अनोळखी व्यक्तीबरोबर ऑनलाईन व्यवहार करताना पुर्ण खात्री करावी, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Back to top button