⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

अडीच हजारांची लाच घेताना लिपीक अडकला जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२३ । चाळीसगाव तहसील कार्यालयातील लिपीकाला अडीच हजारांची लाच घेतला आज गुरुवारी सायंकाळी धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. दिपक बाबूराव जोंधळे (वय-४७) रा. शास्त्री नगर, चाळीसगाव) असे लाखखोर लिपिकाचे नाव असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

काय आहे नेमका प्रकार
चाळीसगाव शहरातील तक्रारदार यांचे पक्षकारांविरुद्ध मेहुबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये मेहुणबारे पोलीस स्टेशन कडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

सदर प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपी त्यांना पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्याकरिता मदत करण्यासाठी लिपीक दिपक जोंधळे यांनी तक्रारदार यांच्याकडे अडीच हजाराची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली. गुरूवार १० ऑगस्ट रोजी पथकाने सापळा रचत लिपीक दिपक जोंधळे याला अडीच हजाराची लाच घेतंना रंगेहात पकडले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.