जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२५ । सप्टेंबर महिना उजेडात आला तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणीच्या नजरा लागल्या आहेत. अशातच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी बातमी समोर आलीय.

आज किंवा उद्या ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. खरंतर ऑगस्ट महिन्याचा लाभ गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, गणेश चतुर्थीला लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे आता गौरीपूजननिमित्त ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तीन दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असून आज किंवा उद्या ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार?
दरम्यान आता सप्टेंबर महिना सुरु झाल्यामुळे दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. ऑगस्टचाही हप्ता सप्टेंबर महिन्यात दिला जाईल. त्यामुळे या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.












