मेष :
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी सुसंगत असाल, तुमच्या घरात काही कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात.काही गोष्टी आजच्या दिवसात सकारात्मक भर घालणार आहेत. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ – गणेश चतुर्थी व्रतोत्सवाचा आरंभ आज होत आहे. बुद्धीची देवता तुमच्या आयुष्यात आज धन सुद्धा घेऊन येणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. आज तुम्हाला व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल.

मिथुन – घरातील सणाच्या धांदलीमध्ये आज तुम्ही व्यस्त रहाल आज तुमची सामाजिक कार्यात रुची वाढेल. सामाजिक कार्याशी संबंधित लोकांसाठी आज चांगली बातमी येऊ शकते,
कर्क – भावंड सौख्य उत्तम राहणार आहे. आज जवळचे प्रवास जसे की अष्टविनायक यात्रा, ११ मारुती आपल्याकडून घडणार आहेत. पत्रव्यवहार सुरळीत आणि मार्गी लागतील.
सिंह – पसा भरून असलेले सुख आज द्विगुणीत होणार आहे. गणेशाच्या आगमनामुळे आज कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक राहील. धनयोग चांगले आहेत. सुवर्ण खरेदी होईल.
कन्या – नेहमीच चोख कामे करणारी आणि बुद्धिमान अशी असणारी आपली रास. गणेश चतुर्थी निमित्त वेगळाच आनंद आज आपल्यामध्ये असेल.
तूळ – सणसमारंभ म्हटलं की काही गोष्टी खिशाला गोष्टी जड होतातच. आज खर्चाचे प्रमाण वाढते राहील. कदाचित असे वाटेल की हा खर्च अनाठही झाला. पण गणेशाच्या कृपेने दिवस तुमचा सुलभ आणि मार्गी लागणार हे नक्की.
वृश्चिक – गणनायक असा असणारे गणपती आजच्या दिवसामध्ये आपल्याला अनेक लाभ आणि वृद्धीचा मानस घेऊन आलेला आहे. गुंतवणुकीतून फायदा होईल. मेजवानीचे योग येतील. आनंदमय असा आजचा दिवस आहे.
धनु – कामे तर रोजचीच असतात,आज मात्र तुम्ही कामाच्या ठिकाणी धार्मिक गोष्टीत सामाजिक उपक्रमात विशेष सहभाग घ्याल. यामध्ये तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप नक्की पडणार आहे. अर्थातच गणेशाच्या आगमनाने आपल्या कर्माचा निश्चित उद्धार होणार आहे.
मकर – अनेक दिवस अपेक्षित असणाऱ्या घटना आज गणेशाच्या गणपतीच्या आगमनाने अचानक घडतील आणि एक वेगळाच उत्सवाचा आरंभ आपल्या भाग्यात सुरू होईल. मोठे प्रवास घडण्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. यशाची दालने आज आपल्यासाठी खुली होतील.
कुंभ – अडचणींवर मात करण्याची शक्ती आणि ताकद आज गजानन आपल्याला सहज देणार आहे .ठरवलेल्या कामात कदाचित दिरंगाई होईल पण त्यामध्ये प्रत्यक्ष नंतर आलेले सुखही आज आहे. अचानक धनलाभ संभवत आहेत.
मीन – जोडीदाराबरोबर चांगले जमेल. गणेशोत्सवाच्या निमित्त काहीतरी खरेदी, नव्याने व्यवसायाच्या वाटा सापडणार आहेत. सुखमय जीवनाची पाऊलवाट आज सुरू होईल.









