जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२५ । गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दोन तीन दिवसात सोने आणि चांदी दरात मोठी उसळी दिसून आली. यामुळे चांदी दराने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. तर सोन्याचा दरही विक्रमी पातळीकडे वाटचाल करताना दिसत आहे. दरम्यान दोन दिवसानंतर गणपती बाप्पाचे आगमन होणार असून त्यानिमित्त सोने- चांदी खरेदीवर विशेष भर दिला जातो. यानुसार आजचे सोने- चांदीचे दर किती आहेत? हे जाणून घेऊया.

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात किंचित घसरण झाली आहे. आज सोमवारी २५ ऑगस्ट रोजी सोन्याच्या किमतीत ५७ रुपयांची घसरण दिसून आली आहे. यानंतर २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १०,१५१ रूपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ९,३०५ रूपये आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ७,६१४ रूपये इतका आहे.

दुसरीकडे आज चांदी दरात वाढ दिसून आलीय. चांदीचा दर १,२१,००० प्रति किलो ग्रॅम आहे. ही वाढ गेल्या शुक्रवारच्या तुलनेत ३०० रुपयांनी जास्त आहे.












