उपमुख्यमंत्री अजित पवार ‘या’ तारखेला जळगाव शहरात येणार

ऑगस्ट 14, 2025 11:00 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२५ । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव शहरात येणार आहे. येत्या रविवारी (१७ ऑगस्ट) ते येणार आहेत. त्यांचा अधिकृत दौरा अद्याप प्राप्त झाला नसला तरी प्रशासकीय पातळीवरील तयारीला वेग आला आहे. बुधवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत बैठक घेऊन संबधित विभागांना सूचना केल्या.

ajit pawar 2 jpg webp

पवार हे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्थ, जिल्हा नियोजन मंडळ, ट्रेझरी व बँकींग या विभागांच्या आढावा बैठक घेण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कामे, योजनांच्या स्थितीचा आढावा जिल्हाधिकारी प्रसाद यांनी घेतला. शासनाने नियोजन केलेल्या कामांची गती, स्थितीची माहिती घेतली.

जी कामे अंतिम टप्यात आले ती लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच १६ व १७ असे दोन दिवस कोणतेही प्रशासकीय अधिकारी मुख्यालय सोडून जाणार नाही, सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाची अद्ययावत माहिती घेऊन हजर राहवे. गरज भासल्यास सादरीकरण करावे लागणार आहे, अशा सूचना केल्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now