Gold Rate ग्राहकांना दिलासा! जळगावमध्ये सोने दरात घसरण, आताचे दर तपासून..

ऑगस्ट 12, 2025 10:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२५ । सलग पाच दिवस विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या सोन्याच्या किमतीत सोमवारी घसरण झाली. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. सोमवारी जळगावच्या सराफ बाजारात सोने दरात ८०० रुपयाची घसरण झाली तर चांदी दरात प्रति किलो १००० रुपयाची घसरण झाली. दरम्यान सोन्याच्या दरात जरी घसरण झाली तरीही सोन्याचे दर एक लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आजही सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न खरेदीदारांना पडलेला आहे.

gold silver jpg webp

जळगाव सराफ बाजारात सोमवारी २४ कॅरेट सोने दरात ८०० रुपयाची घसरण होऊन विनाजीएसटी १००७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोने दरात ७०० रुपयांची घसरण होऊन ९२३१२ रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळ्यावर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीचा दर ११५००० रुपये प्रति किलोवर आहे.

दरम्यान, मागच्या आठवड्यात सोने दराने नवीन उच्चांक गाठला. ऐन रक्षाबंधनला सोन्याने उच्चांकी गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसली. यांनतर मात्र सोने दरात घसरण होताना दिसून आली. आगामी दिवाळीपर्यंत सोन्याचे कुठवर जाणार याकडे आता ग्राहकांचे लक्ष राहणार आहे.

घसरणीचे कारण काय?

दरम्यान, भू-राजकीय तणाव काहीअंशी कमी झाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याच्या मागणीत आता थोडी नरमाई आली आहे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १५ ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार असल्याच्या चर्चेमुळेही बाजारातील तणाव कमी झाला आहे. याचा परिणाम म्हणून सोन्याच्या किमतीमध्ये काही प्रमाणात घसरण दिसत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now