जळगावचे DYSP गावितांची भुसावळात बदली ; जिल्ह्यात दोन नवीन उपअधीक्षक येणार

ऑगस्ट 1, 2025 12:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२५ । गृह विभागाने राज्य पोलिस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापनांबाबत आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार जळगाव शहरातील एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली असून, दोन नवीन अधिकारी जिल्ह्यात रुजू होणार आहेत.

maharashtara police jpg webp

गुरुवारी राज्य शासनाने पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त (निःशस्त्र) या संवर्गातील ६५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात जळगाव शहर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांची भुसावळ शहर उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली झाली आहे. या बदल्यांत जळगाव जिल्ह्यात बाहेरून दोन नवीन उपअधीक्षक येणार आहेत.

विजय ठाकूरवाड यांची चाळीसगाव उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून तर बापू रोहोम यांची मुक्ताईनगर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now