जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२५ । अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५% कर लावण्याची घोषणा बुधवारी केली आहे, जो १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल. या नवीन आयात कर लागू झाल्यावर अनेक व्यावसायिंक क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. दरम्यान या टॅरिफमुळे भारतातील सामान्य माणसावर काय परिणाम होणार हे जाणून घ्या.

ट्रम्प यांनी या निर्णयाला “परस्पर कर” म्हटले आहे आणि दावा केला आहे की हा निर्णय भारताने अमेरिकन वस्तूंवर उच्च कर लादल्याच्या भारताच्या निर्णयांना प्रतिसाद आहे. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम भारतातील निर्यातदारांवर होईल, विशेषतः ऑटोमोबाईल, औषधनिर्माण आणि रत्ने आणि दागिने उद्योगांवर. ही क्षेत्रे अमेरिकेच्या मोठ्या ग्राहक बाजारपेठेवर अवलंबून आहेत आणि आता २५% करमुळे किंमत स्पर्धात्मकता कमी होईल, ज्यामुळे निर्यातीत स्थिरता येऊ शकते.

कापड आणि वस्त्र उद्योगांवर परिणाम
भारताची टेक्स्टाईल इंडस्ट्री मोठी आहे. भारत हा कापड आणि वस्त्रोद्योगात सर्वात जास्त निर्यात करते. अमेरिक अनेक कपडे आणि पादत्राणे भारताकडून खरेदी करते. टॅरिफ लागू झाल्यावर अमेरिकन बाजारपेठेत या वस्तू महाग होतील. त्यामुळे परिणामी भारतीय कंपन्यांच्या ऑर्डर आणि शिपमेंटवर परिणाम होईल आणि निर्यात कमी होईल.
दागिने आणि हिरे
भारत हा जगातील सर्वात जास्त हिरा निर्यात करणारा देश आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात दागिने आणि हिऱ्याची निर्यात होते. टॅरिफ कर लादल्यानंतर दागिने आणि हिरे महाग होतील.
ऑटोमोबाईल क्षेत्रावर परिणाम
भारत अमेरिकेला ऑटोमोबाईल आणि ऑटो पार्ट्सची निर्यात करते. त्यामुळे १ ऑगस्टपासून या पार्ट्सच्या किंमती वाढू शकतात आणि मागणी कमी होऊ शकते.
मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला फटका
भारत दरवर्षी १४ अब्ज डॉलर्सच्या किंमतीचे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची निर्यात करते. अमेरिकेच्या टॅरिफ करामुळे हे दर वाढतील. यामध्ये भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची निर्यात कमी होऊ शकते.
या क्षेत्रावर होणार परिणाम
अमेरिकेने टॅरिफ कर लादला आहे. यामध्ये औषधे, ऊर्जा उत्पादने त्यात तेल, वायू, कोळसा आणि तांबे यांचा समावेश आहे. त्यामुळे याच्या निर्यातीवर परिणाम होतो. परिणामी मागणी कमी होईल आणि भारताला फटका बसेल.












