Jalgaon : मशिनसह दुचाकी लंपास करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

जुलै 26, 2025 12:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहे. अशातच कंपनीच्या आवारातून सोया पनीर बनवण्याच्या मशिनसह दुचाकी लंपास करणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी पकडले. प्रशांत उर्फ बाप्या पंडीतराव साबळे व नितीन उर्फ मित्या रोहीदास चव्हाण (दोघे रा. सुप्रिम कॉलनी) असे या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरलेला १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

crime 2 jpg webp

एमआयडीसीतील व्ही- सेक्टरमध्ये असलेल्या भोसले इंडस्ट्रीज कंपनीच्या कंपाउंडमध्ये लावलेली दुचाकी आणि तेथे ठेवलेली सोया पनीर बनवण्याची मशिनरी २० ते २२ जुलै दरम्यान चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी सुरेश रामचंद्र पाटील यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक राहुल तायडे, हेड कॉन्स्टेबल गिरीश पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी यांचे पथक नेमले होते. या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

त्यावरून राहुल रगडे व विशाल कोळी यांनी प्रशांत उर्फ बाप्या पंडीतराव साबळे व नितीन उर्फ मित्या रोहीदास चव्हाण (दोघे रा. सुप्रिम कॉलनी) या संशयिताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकी आणि सोया पनीर बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास एमआयडीसी ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल संजीव मोरे, मंदार महाजन हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now