मंत्री गुलाबराव पाटलांची हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबात मोठी माहिती ; काय म्हणाले वाचा..

जुलै 24, 2025 2:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२५ । जल जीवन मिशनचे काम करूनही 1.40 लाख रुपयांचे थकीत बील न मिळाल्याने सांगलीतील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर आता राजकारण चांगलेच तापले असून विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. मात्र, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबात मोठी माहिती दिली आहे.

gulabrao patil vs harshal patil

काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील?

हर्षल पाटील हा अभियंता असून तांदळे वाळवा या गावचा अभियंता आहे अभियंत्याने आत्महत्या केली असून याप्रकरणी त्या अभियंत्याच्या नावावर कुठलंच काम नाही आहे. त्या योजनेवर कुठलं बिल पेंडिंग नाही. एखाद्या वेळेस त्यांनी हे काम घेतलं असावं, मात्र या बिलाची कुठेच नोंद नाही मी स्वतः अधिकाऱ्यांची संपर्क केला असून त्यांनी स्वतः काम केलं असेल तर याबाबत काही माहीत नाही.

‘जो आरोप केला जातो आहे की हर्षल पाटील यांच्या जल जीवन मिशनच्या कामाचे पैसे थकले होते त्यामध्ये तथ्य नाही. मी स्वतः याविषयी जिल्हा परिषदेच्या सीईओंशी आणि कार्यकारी अभियंत्याशी बोललो आहे. हर्षलला कोणतेही काम जिल्हा परिषदेकडून देण्यात आले नव्हते. तसेच त्यांचे कोणतेही बिल पेंडीग नाही. जर त्यांना सबलेट काम घेतले असेल तर त्याविषयी आम्हाला माहिती नाही.’, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now