जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर केला आहे.यात माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या राज्यात शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासोबतच राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असून तरीदेखील यांना निर्णय घेता येत नाही. कारण प्रत्येक गोष्ट भाजपला विचारावी लागते. त्यामुळे आता हातात काहीच काम शिल्लक नसल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात बसून रमी खेळत असल्याची खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे.

“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!”
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 20, 2025
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या… pic.twitter.com/52jz7eTAtq
रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, जंगली रमी पे आओ ना महाराज! सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा कर्जमाफी द्या, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता यावर माणिकराव कोकाटे काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.












