जळगाव शहरवासीयांसाठी आजच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची बातमी

जुलै 19, 2025 8:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२५ । जळगाव शहरवासीयांची उद्याच्या पाणीपुरवठ्याबाबत एक महत्वाची बातमी आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर पंपींग स्टेशन व उमाळा जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल व विद्युत वाहिनीवरील झाडांच्या फांद्या तोडणे, विद्युत वाहिनी दुरुस्तीची कामे उद्या शनिवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी १९ जुलै रोजी होणार शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला असे महापालिकेकडून पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

manapa nal jpg webp

काय म्हटलं आहे पत्रात?

वाघुर पंपींग स्टेशन व उमाळा जलशुध्दीकरण केंद्र येथे विज पुरवठा करणारी 33 केव्ही उच्चदाब विद्युत वाहीनीवर मागील काही दिवसात ट्रिपींग होण्याचे प्रकार हे वारंवार आढळून येत आहेत. सदर वाघुर उच्चदाब 33 केव्ही वीज वाहीनीची देखभाल व दुरुस्तीकामी तसेच झाडे छाटणीचे काम पुर्ण करणेकामी दि. 19 रोजी म.रा.वि.वि. कंपनी मर्या., जळगांव यांचे मार्फत दुरुस्तीचे काम हाती घेण्यांत आलेले आहे.

तरी दि.19 रोजीचा पाणी पुरवठा दि. 20 जुलै रोजी करण्यात येईल व दि. 20/07/2025 चा नियोजित भागांचा पाणी पुरवठा एक (1) दिवस उशिराने होणार असून याची नागरीकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असं महापालिकेने म्हटलं आहे.

या भागाचा पाणीपुरवठा रविवारी होईल

वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड व परिसर. नित्यानंदनगर टाकी परिसर मोहननगर, नेहरूनगर परिसर, खंडेरावनगर परिसर, पिंप्राळा गावठाण, नूतन वर्षा कॉलनी, मानराज टाकीवरील भाग- दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी. खोटेनगर टाकीवरील भाग-द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, खोटेनगर. गेंदालाल मिल टाकीवरील शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी परिसर. योगेश्वर नगर, शंकरराव नगर व खेडीगाव परिसर. डीएसपी टाकी -तांबापुरा, गणपती नगर व परिसर. शिव कॉलनी, विद्युत कॉलनी, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर व इतर भाग. अयोध्यानगर पहिला दिवस- गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हौसिंग सोसा., जगवानीनगर मेहरुण पहिला दिवस- सदाशिव नगर, रामनगर, रजा कॉलनी, अक्सानगर.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now