Breaking: जयंत पाटलांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा ; नवीन प्रदेशाध्यक्षही ठरला?

जुलै 12, 2025 1:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२५ । महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून एक मोठी बातमी समोर आलीय. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार झाले आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

jayant patil

दरम्यान यांनतर आता शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

10 जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनीच जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करा, अशी मागणी केली होती. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या पदासाठी साताऱ्याचे आमदार शशिकांत शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now