जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२५ । महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्वाची बातमी असून इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने 14 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सरकारच्या अन्यायकारक कर धोरणांविरुद्ध हा एल्कार पुकारला आहे. या संघटनेने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे सोमवारी राज्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार आहेत. यामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

आहार संघटनेने महाराष्ट्र बंदच्या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक का दिली यामागचे कारण सांगितले आहे. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने म्हटले आहे की, सरकारने काही दिवसांपूर्वी दारूवरील व्हॅट दुप्पट केला आहे.

त्यामुळे ज्यामुळे हॉटेल आणि बार उद्योगावरील आर्थिक भार वाढला आहे. त्याचबरोबर परवाना शुल्कात 15% आणि उत्पादन शुल्कात 60 % वाढ करण्यात आली असल्याने व्यापाऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) द्वारे ‘१४ जुलै २०२५ रोजी राज्यव्यापी बंदची घोषणा करण्यात आली आहे.
सरकारच्या करविषयी धोरणाविरोधात आहार संघटनेने बंद पुकारला आहे. ही आमच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे आहार संघटनेने सांगितले. आहार संघटनेच्या नेतृत्वाखआली २० हजाराहून अधिक हॉटेल रेस्टॉरंट मालकांनी सरकारच्या अन्यायकारक कर धोरणाचा विरोध करण्याचे ठरवले आहे.
या बंदमुळे सोमवारी राज्यभरातील सर्व परमिट रूम, बार आणि हॉटेल-रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. आहार संघटनेचा हा बंद शांततेत असणार आहे. पण जर सरकारने दखल घेतली नाही तर येत्या काळात हिंसक आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.












