राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द ; शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?

जुलै 10, 2025 12:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा विधानसभेत केली आहे. या निर्णयाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणारा कायदा १९४७ नुसार ठराविक प्रमाणात कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनींची खरेदी-विक्री कायद्याने प्रतिबंधित होती. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२५ पर्यंत शहरी भाग, गावठाण पासून २०० मीटर पर्यंत आणि विविध प्राधिकरणांमधील भागात झालेले सर्व तुकड्यांचे व्यवहार मान्य करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे एक गुंठेपर्यंत जमिन व्यवहारासाठी तुकडेबंदी कायदा रद्द केला जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री यांनी केली.

tukadebandi act

राज्य शासनाने ८ ऑगस्ट २०२३ रोजीच्या अधिसूचनेनुसार, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अकोला आणि रायगड जिल्हे वगळता राज्यातील इतर ३२ जिल्ह्यांमध्ये स्थानिक क्षेत्र घोषित करून बागायतीसाठी १० आर आणि जिरायतीसाठी २० आर इतके प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केले आहे. यामध्ये महानगरपालिका व नगरपरिषदा हद्दीतील क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला नाही. धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत १९४७ च्या कायद्यातील कलम ७, ८ व ८अ नुसार स्थानिक क्षेत्रामध्ये जमिनीचे तुकडे निर्माण होणार नाहीत, अशा पद्धतीनेच हस्तांतरण करता येते. मात्र, १ जानेवारी २०१६ रोजीच्या अधिसूचनेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण किंवा नगरविकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या, तसेच प्रादेशिक योजनेत अकृषिक वापरासाठी निश्चित केलेल्या जमिनी या कायद्याच्या तुकडेबंदीच्या नियमांपासून वगळण्यात आलेल्या आहेत.

तुकडेबंदी कायद्यामुळे अनेक व्यवहार प्रलंबित होते. नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हा कायदा रद्द केल्यामुळे कमी क्षेत्राची खरेदी-विक्री करता येणार आहे. खरंतर आता तुकडाबंदी कायदा रद्द झाल्यामुळे शहरी भागात 1 गुंठा जागा खरेदी आणि विक्री कऱण्याची मुभा मिळणार आहे. तर हा कायदा रद्द केल्याने तब्बल 50 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

तुकडाबंदी कायदा रद्द, फायदा काय?
तुकडा बंदीनुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन खरेदी-विक्रीला बंदी
आता शहरी भागात 1 गुंठ्यापर्यंत जमीन खरेदी-विक्री करता येणार
1 जानेवारी 2025 पूर्वी झालेल्या व्यवहारांचीही पुन्हा रेकी करणार
राज्यातल्या तब्बल ५० लाखांपेक्षा जास्त लोकांना लाभ होणार
ग्रामीण भागात जिरायतीसाठी 20 गुंठे, बागायतीसाठी 10 गुंठ्याची मर्यादा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now