पांडुरंगाच्या जयघोषात पिंप्राळ्यातील रथोत्सवात भक्तांचा मेळा

जुलै 6, 2025 4:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२५ । प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या जळगावातील पिंप्राळा येथे आज ६ जुलै रोजी पांडुरंगाच्या रथोत्सवाच्या आयोजन करण्यात आले होते. रथउत्सवामध्ये मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये जय जय राम कृष्ण हरीचा जयघोष करत जय हरी विठ्ठलाचा जय घोष करत हा रथउत्सव पिंप्राळा येथून काढण्यात आला

rathotsav pimprala

जवळपास 150 वर्षाची रथ उत्सवाची परंपरा असून यामध्ये ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक वेशभूषा परिधान करत भक्तगणांनी आपला सहभाग नोंदवला होता. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते भावीक या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनीही लेझीमच्या तालावर यावेळी ठेका धरला

आषाढी एकादशीनिमित्त पिंप्राळा उपनगरातील श्री विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंचमंडळ व ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने रथोत्सवात भक्तीचा मेळा रंगला होता. रथाला पानाफुलांनी सजवून, आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्यात आली. रथोत्सव पाहण्यासाठी खानदेशातील विठ्ठलभक्त आले होते. सकाळी श्री विठ्ठल मंदिरात पहाटे पाचला विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचा महाअभिषेक व पूजन झाले. यांनतर रथाची महापूजा झाली. पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या नामघोषात आमदार सुरेश भोळे आदींसह भक्तगणांनी दोराने रथ ओढण्याचा आनंद लुटला. रथापुढे पालखी, भजनी मंडळ, दिंडी, भगवे झेंडे, गुरव मंगल वाद्य, लेझीम, भवानी देवीची सोंग हे भाविकांचे आकर्षण ठरले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now