.. तरच मध्य प्रदेशच्या बसला जळगाव बसस्थानकात प्रवेश!

जुलै 6, 2025 12:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अनेक शहरांमध्ये दोन्ही राज्याच्या बसेसची दररोज ये-जा असते. परंतु आता दोन्ही राज्यातील परिवहन विभागात वाद निर्माण झाला असून दोन्ही राज्यातील बसस्थानकात बसेसला प्रवेश दिला जात नसल्याचे समोर येत आहे. जळगाव बसस्थानकातदेखील मध्य प्रदेशच्या बसकडे परवाना असेल तरच प्रवेश देऊन काही वेळासाठी गाडी उभी करून दिली जात आहे.

bus

जळगाव एसटी विभागाची मध्यप्रदेश राज्यातील इंदोर, बऱ्हाणपूर या शहरात बस सेवा सुरू आहे. मध्यप्रदेश परिवहन विभागाच्या बसेस खासगी मक्तेदारातर्फे चालविल्या जातात. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी महाराष्ट्राच्या बस मध्ये प्रवाशांना बसू न देणे, बसस्थानकात बस उभी न करू देणे असे प्रकार होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र एसटी महामंडळानेदेखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार जळगाव एसटी विभागाने मध्यप्रदेश मधील इंदोर, बऱ्हाणपूर येथून येणाऱ्या बसेसला बसस्थानकात प्रवेश देण्यापूर्वी त्यांच्याकडील कागदपत्रे, परवाना तपासले जात आहे.

जळगाव विभागाच्या १६ बसेस

जळगाव विभागाच्या १६ बसेस या मध्यप्रदेशमधील इंदोर व बऱ्हाणपूर येथे धावतात. यात इंदोर येथे ४ तर बऱ्हाणपूर येथे १२ बसेस जातात. तर मध्यप्रदेशमधील ७ बसेस या जळगाव बसस्थानकात येत असल्याची माहिती एसटी विभागाकडून मिळाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now