ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांची आता खैर नाही ! विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय..

जुलै 2, 2025 5:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२५ । राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु असून यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारीअंतर्गत त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा या अधिवेशनातच केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

drugs fadanvis

विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके, एकनाथ खडसे यांनी ड्रग तस्करी संदर्भात प्रश्न विचारला होता, त्यास मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ड्रग्सच्या वाढत्या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. विधान परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, की राज्यात ड्रग्सची तस्करी खपवून घेतली जाणार नाही. या प्रकरणी ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनीही यावर लक्ष वेधले. इतर राज्यांतून, विशेषतः मध्यप्रदेश आणि गुजरात सीमेवरून जळगाव आणि मुक्ताईनगर परिसरात अफू आणि गांजाची तस्करी होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं की, काही राज्यांमध्ये ‘भांग’ला कायदेशीर परवानगी आहे, पण आपल्याकडे अफूला कुठेच परवानगी नाही. मुक्ताईनगर आणि इतर ठिकाणी असे प्रकार घडत असतील, तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now