पोस्टल लाइफ इन्श्युरन्समध्ये १०वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी ; विनापरीक्षा होणार थेट निवड

जून 21, 2025 11:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । 10वी पास असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी चालून आलीय. टपाल विभागाच्या ‘पोस्टल लाइफ इन्श्युरन्स’ मध्ये भरती निघाली आहे. विशेष या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेण्यात येणार नसून, उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

Postal Life Insurance Recruitment

अभिकर्ता पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. १ जुलै रोजी ही मुलाखत होणार आहे.

भरतीसाठी पात्रता :
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त केंद्रीय किंवा राज्य सरकारच्या बोर्डातून १०वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. याचसोबत अर्जदाराला विमा क्षेत्रात कामाचा अनुभव असावा.१८ ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

मुंबई येथे नोकरीचे ठिकाण असणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. १ जुलै रोजी ही मुलाखत होणार आहे. मुलाखतीला उपस्थित राहताना तुम्हाला शैक्षणिक प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो घेऊन यायचे आहे. उपनिदेशक (टपाल जीवन विमान विभाग), मुख्य कार्यालय, मुंबई-४००००१ येथे पाठवायचा आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment