जळगाव जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले; आज कसे राहणार हवामान?

जून 12, 2025 8:01 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२५ । गेल्या काही दिवसांपासून राज्यात विश्रांती घेतलेल्या मान्सूननं आता पुन्हा एकदा आपला मोर्चा महाराष्ट्रातील बहुतांश भागांकडे वळवण्यास सुरुवात केली आहे. काल दि ११ रोजी जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी वादळी पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर घरावरची देखील पत्रे उडाली. दरम्यान हवामान खात्यानं आज दि १२ जून रोजी राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भाच्या काही भागांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

rain 1

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मान्सूनच आगमन यंदा मे महिन्याच्या शेवटी झाले. यानंतर तीन चार दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र त्यांनतर पावसाने विश्रांती घेतली. दुसरीकडे पावसाने उसंती घेताच सूर्य तापू लागला. सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत होता. यामुळे उकाड्यातही वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान हवामान खात्याने राज्यात पावसाचा इशारा दिला होता.

त्यानुसार बुधवारी राज्यातील अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. आज हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहेय.आज विदर्भात नागपूर, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया अमरावती, आणि अकोला या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

तर जळगाव जिल्ह्यातही आजपासून तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यासाठी हवामान विभागाकडून १२ ते १४ जूनदरम्यान जळगाव जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.या काळात 40 ते 60 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील असा इशारा हवामान विभागाने दिला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment