जळगावातील फुले मार्केट आज दुपारी २ पर्यंत राहणार बंद; खरेदीला जाण्यापूर्वी वाचा बातमी

मे 30, 2025 9:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२५ । तुम्ही देखील आज जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी जात असाल तर तुमच्यातही एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच आज फुले मार्केट आज दुपारी २ पर्यंत बंद राहणार आहे. महापालिकेकडून गाळे धोरण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात गाळेधारकांकडून अवाजवी भाडे वसुलीची शक्यता लक्षात घेता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Fule market jpg webp

महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील ७०० गाळेधारकांनी शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा तसेच सकाळी १०.३० वाजता महापालिकेवर काळ्या फिती लावून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना खरेदीसाठी दुपारनंतरचे नियोजन करावे लागणार आहे. महापालिकेच्या गाळेभाडे निर्धारण समितीच्या तीन बैठकांत शहरातील व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांसोबत नव्याने करार करण्याच्या अनुषंगाने भाडे निश्चितीवर चर्चा झाली आहे.

अद्याप प्रशासनाने भाड्याचे दर जाहीर केलेले नाहीत; परंतु मनपाकडून रेडी रेकनरच्या सात टक्के दराने आकारणी करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पूर्वी आठ टक्के होती आता केवळ एक टक्का कमी केली जाण्याची शक्यता आहे. सात टक्के दराने आकारणीला गाळेधारकांनी विरोध दर्शवला आहे. ही मागणी अवाजवी असून, न परवडणारी असल्याने महात्मा फुले व महात्मा फुले मार्केट पहिला मजला व सेंट्रल फुले मार्केट या तीन मार्केटमध्ये असलेले गाळेधारकांनी शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment