दोन दिवसात सोन्याचा तोळा ३२०० रुपयांनी महागला; जळगावातील लेटेस्ट दर तपासून घ्या

मे 7, 2025 4:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२५ । गेल्या आठवड्यात घसरण झालेल्या सोने आणि चांदी दरात आता पुन्हा वाढ होताना दिसत आहे. जळगाव सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने चांदी दरात मोठी वाढ झाली. यामुळे सोन्याचा तोळा पुन्हा एकदा जीएसटीसह लाखाच्यावर गेल्यामुळे खरेदीदरांची चिंता वाढली आहे.

gold silver jpg webp

जळगाव सराफ बाजारात मंगळवारी सोने १४०० रुपयांनी वाढून ९७, २०० रुपये तोळ्यावर (जीएसटीसह १,००,११६) पोहोचले. सोन्याने यंदा तिसऱ्यांदा एक लाखांचा टप्पा पार केला आहे. तर मंगळवारी चांदीच्या दरात २ हजारांनी वाढ होऊन किलोमागे दर ९७,००० (जीएसटीसह ९९,९१०) वर पोहोचले.

दरम्यान या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने १८०० रुपयांनी वाढले होते. त्यानंतर मंगळवारी १४०० रुपयांनी वाढले. यामुळे गेल्या दोन दिवसात जळगावात सोने दरात ३२०० रुपयांनी वाढले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment