दिल्लीचा प्रवास होणार सुफरफास्ट ; भुसावळामार्गे धावणार ”वंदे भारत स्लीपर ट्रेन”

मे 4, 2025 11:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२५ । भुसावळकरांचा आता दिल्लीचा प्रवास सुफरफास्ट होणार आहे. कारण भारतीय रेल्वेकडून लवकरच भुसावळामार्गे पुणे ते नवी दिल्ली दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळेल. यामुळे व्यवसायिक, पर्यटक आणि कुटुंबांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल.

vande bharat sleeper train

पुण्यातून लवकरच दिल्लीसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. पुण्यातून निघणारी वंदे भारत स्लीपर १५८९ किमीचे अंतर २० तासांत पार करेल. विशेष या ट्रेनला भुसावळ स्थानकावर थांबा असणार आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळेल. भुसावळहुन नवी दिल्लीचे अंतर १०९८ इतके असून जवळपास १२ ते १३ तासात दिल्ली पोहोचेल. वंदे भारत स्लीपर ट्रेन १६० किमी प्रतितास वेगाने धावेल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

कोण कोणत्या स्थानकावर थांबेल ?
नवी दिल्ली रेल्वे स्थानक (एनडीएलएस) येथून पुण्यासाठी निघणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन मथुरा, आग्रा कॅन्ट, ग्वाल्हेर, भोपाळ जंक्शन, खंडवा आणि भुसावळ या प्रमुख स्थानकांवर थांबेल. या ट्रेनमध्ये एकूण १६ डबे असतील, यात ११ एसी ३ टियर, ४ एसी २ टियर आणि १ फर्स्ट क्लास एसी बोगी असीतल.

किती भाडे लागेल?
इकॉनॉमिक टाइम्स नाऊच्या अहवालानुसार, एसी ३ टियरचे तिकीट २५०० रुपये इतके असेल. तर एसी २ टियरचे ४००० रुपये आणि फर्स्ट क्लास एसीचे ५००० रुपये असण्याची शक्यता आहे.

वंदे भारत स्लीपर ही ट्रेन नवी दिल्लीहून सायंकाळी ४:३० वाजता निघेल आणि रात्री १:०० वाजता पुणे जंक्शनवर पोहोचेल. परतीच्या प्रवासात पुण्याहून दुपारी ३:०० वाजता ही ट्रेन निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:३० वाजता दिल्लीला पोहोचेल. नवी दिल्ली आणि पुणे या दोन शहरांमध्ये प्रवास कऱणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment