Jalgaon : हरभऱ्याचा भाव 2000 रुपयांनी घसरला, गव्हाच्या दरात मात्र वाढ ; जळगावात असे आहेत भाव?

एप्रिल 14, 2025 10:19 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२५ । एकीकडे अवकाळी पाऊस होत असून यामुळे शेती पिकाचे नासधूस होत आहे. यातच राबराबून पिकविलेल्या पिकांच्या दरात घसरण होताना दिसत आहे. यामुळे शेतकरी चांगलाच कोंडीत सापडला आहे. रब्बी पिकांची काढणी पूर्णझाल्यामुळे जळगाव बाजार समितीमध्ये धान्याची आवक वाढल्यामुळे भावात चढ-उतार होत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गुलाबी हरभऱ्याचे १० हजार रुपयांवर गेलेले भाव दोन आठवड्यात २ हजार रुपयांनी घसरले आहेत.

gahu harbhara 1

आठवडाभरापासूनच हरभऱ्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. सर्वच प्रकारच्या हरभऱ्याच्या काही प्रमाणात घट झाली आहे. २८ मार्च रोजी गुलाबी हरभऱ्याचे दर १० हजार ५०० रुपये क्विंटल इतके होते; मात्र आठ ते दहा दिवसांत दररोज हरभऱ्याच्या दरात घट झाली आहे. शनिवारी १२ एप्रिल रोजी बाजार समितीमध्ये गुलाबी हरभऱ्याचे दर ८१०० रुपये प्रतिक्विंटल एवढे होते. भाव कमी होताच, बाजार समितीमध्ये गुलाबी हरभऱ्याची अवाक देखील कमी झाली आहे.

गव्हाच्या दरात मात्र वाढ…
नवीन गव्हाच्या दरात २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. ५ एप्रिल रोजी नवीन गव्हाचे दर २४०० रुपयांवर गेले होते. तर शनिवारी हेच दर २८०० रुपयांवर आले होते. बाजार समितीत दररोज १०० क्विंटलपर्यंत गव्हाची आवक आहे. तर २०० ते २५० क्विंटलपर्यंत हरभऱ्याची आवक सुरू आहे. शुक्रवारी ३३०० पर्यंत गेलेले दादरचे दर शनिवारी ४०० रुपयांनी कमी होऊन २००० रुपयांवर आले होते

१२ एप्रिल रोजी असे होते दर (प्रतिक्विंटल)
हरभरा चाफा – ५१०० ते ५६२० रुपये
गुलाबी हरभरा – ८१०० रुपये
हरभरा चिनोली – ७३०० ते ७४०० रुपये
गहू – २७०० ते २८०० रुपये
बाजरी – २७६० रुपये
दादर – २२०० ते २९७५ रुपये
तूर – ७१०० रुपये
सोयाबीन – ४००० रुपये

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment