जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२५ । गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढलेला पाहायला मिळाला असून तापमानाने चाळीशी गाठल्याने उष्णतेमुळे जळगावकर हैराण झाले. रविवारी मात्र अचानक वातावरणात बदल होऊन जळगाव शहरात दुपारपासून काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. त्यातच जिल्ह्यात वाहत असलेल्या वेगवान वाऱ्यांमुळे तापमानात काही प्रमाणात घट झालेली पाहायला मिळाली. दरम्यान उद्या १९ मार्च रोजी जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. तर २३ मार्चनंतर तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.

सोमवारी जळगावचे कमाल तापमान ३८.५ तर किमान तापमान २० अंशापर्यंत होते. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत होती, यामुळे उन्हाचा तडाखा वाढत जात होता. कमाल तापमान चाळीशीवर गेल्याने सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाचा चटका बसत आहे. दुपारच्या वेळेस तर सूर्य आग ओकत आहे. यामुळे दुपारच्या सत्रात रस्त्यांवर वर्दळ कमी दिसून आली. रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने उकाडा जाणवत आहे.
मात्र मागील दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण तयार होत असल्याने तापमानात घट दिसून आली. त्यातच जिल्ह्यात वाहत असलेल्या वेगवान वाऱ्यांमुळे तापमानात काही प्रमाणात घट झालेली पाहायला मिळाली. शनिवारी ३९.४ अंशावर असलेले तापमान एका अंशाने कमी होऊन रविवारी ३८ अंशावर आले होते.
दरम्यान. वातावरणात होत असलेल्या बदलाचा परिणाम म्हणून आगामी तीन ते चार दिवस जिल्ह्यात काही अंशी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर, १९ मार्च रोजी जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. २३ मार्चनंतर तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. १४ किमीने वाहताहेत वारे, वातावरणात झाला बदल झालेला पहायला मिळाला. आगामी तीन ते चार दिवस अशाच प्रकारे वारे वाहण्याचीही शक्यता आहे.
आजपासून आगामी चार दिवस असे राहणार तापमान
१८ मार्च- ३९ अंश….. वातावरणाची स्थिती – कोरडे हवामान
१९ मार्च – ३८ अंश…..वातावरणाची स्थिती – विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
२० मार्च – ३७ अंश….. वातावरणाची स्थिती – मुख्यतः ढगाळ वातारण
२१ मार्च – ३६ अंश….. वातावरणाची स्थिती – काही अंशी ढगाळ वातावरण