जळगाव लाईव्ह न्यूज । रंगांच्या सण म्हणजे होळीला प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, लोकांचा प्रवास सोपा करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यातच रेल्वे प्रशासन काचीगुडा ते हिसार अशी विशेष गाडी चालवणार आहे. विशेष ही गाडी जळगाव, भुसावळ स्थानकांवर थांबणार आहे.

०७७१७ क्रमांकाची गाडी १३ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता काचीगुडा येथून सुटेल. शनिवारी दुपारी २.०५ वाजता आणि हिसार येथे पोहोचेल. तर ०७७१८ क्रमांकाची गाडी १६ मार्चला रात्री ११.१५ वाजता हिसार येथून सुटून रात्री ९.३० वाजता काचीगुडा येथे पोहोचेल.
ही गाडी कोण कोणत्या स्थानकांवर थांबेल?
ही गाडी मलकाजगिरी, मडचेल, कामरेड्डी, निजामाबाद, बसर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेहगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वडोदरा, रतलाम, मंदसौर, नीमच, चित्तोडगड, भिलवाडा, बिजैनगर, नसीराबाद, अजमेर, किशनगड, फुलेरा, रिंगस, सिकर, नवलगड, झुंझुनू, चिरवा, लोहारू आणि सादुलपूर स्थानकांवर थांबेल.