मेष – आज तुमच्या जोडीदाराची निःस्वार्थपणे काळजी घ्या. तुमचा माजी प्रियकर तुमच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या.

वृषभ -सुखाची नवी पाऊलवाट आज दिसेल. विवाह उत्सुक व्यक्तींचे विवाह ठरतील. संतती होण्यासाठी अथवा त्यांची गोड बातमी मिळेल. दिवस चांगला आणि आनंदी राहील.
मिथुन- लेखन, प्रकाशन, प्रिंटिंग या क्षेत्रातील लोकांना दिवस विशेष संधी घेऊन आलेला आहे. आपला समाजाशी असणारा संपर्क आज फुलून येईल. वेगळ्या पद्धतीने कार्ये घडतील.
कर्क – आज कर्क राशींसाठी महत्वाचा दिवस असणार. घरासाठी खरेदी विक्री घरामध्ये नेहमीपेक्षा अशा गोष्टी आज आपल्याकडून घडतील. पाहुण्यांचे आगमन होईल. दिवस चांगला असेल.
सिंह – स्वतःवर प्रेम जडेल. सकारात्मकता वाढेल. चिकाटीने कार्य कराल. आपली उदारता आणि पोशिंदेपणा यामुळे इतरांना आपलेसे वाटाल. दिवस आनंदी आहे.
कन्या – नको असलेल्या गोष्टी चार हात लांबच ठेवलेल्या बऱ्या. मनस्तापाच्या घटना घडतील. अनवश्यक खर्च, हिशोब न लागण्यामुळे येणारी अस्वस्थता आज जाणवेल.
तूळ – मैत्रीदिन असल्यासारखा आजचा आपला दिवस आहे. जवळच्या लोकांची किंमत त्यांना ही आपली काय आहे हे कळून जाईल. एकत्रित येण्यामुळे वृद्धी होते हे सांगणारा दिवस आहे .अनेक लाभ होतील.
वृश्चिक – समाजकारण, राजकारणामध्ये विशेष फायदा आहे. मनस्थिती चांगली राहील. कार्यक्षेत्र वाढेल. प्रवास घडतील. सन्मान पदरी पडतील.
धनु – सद्गुरु भेटतील. विशेष अध्यात्मविषयी ओढ वाटेल . तीर्थक्षेत्रि भेटी होतील. लांबचे प्रवास घडण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभवार्ता घेऊन आलेला आहे.
मकर – अवजड आणि अवघड बाबी आज आपल्या सामोरे येतील. त्यातून लीलया मार्ग काढावा लागेल. शारीरिक कुरबुर राहील. दिवस संमिश्र आहे.
कुंभ – जाणते, अजाणते पणी केलेल्या चुका आज निस्तराव्या लागतील. जोडीदार, भागीदाराचे याबाबतीत सहकार्य मिळेल. कोर्टाचे निकाल मनाप्रमाणे लागतील.
मीन – पोटाच्या तक्रारी त्रास देतील. पावलांशी निगडित आजार होतील. जुन्या दुखण्यांसाठी आजचा दिवस कटकटीचा ठरेल. योग्य वैद्याच्या शोधात राहावे लागेल. आपल्या विषयी होणाऱ्या गुप्त कारवायांकडे विशेष लक्ष द्या.