जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ ।सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. बँक ऑफ इंडियाने (Bank of India Recruitment 2025) अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे, ज्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofinfia.co.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२५ आहे. एकूण १८० रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. Bank of India Bharti 2025

कोणती पदे भरली जाणार?
1) चीफ मॅनेजर 21
2) सिनियर मॅनेजर 85
3) लॉ ऑफिसर 17
4) मॅनेजर 57
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA (ii) 07/08 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) विधी पदवी (LLB) (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट :
बँक ऑफ इंडियामधील चीफ मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २८ ते ४५ वर्षे असावी. सीनियर मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २८ ते ४० वर्षे असावी. मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २५ ते ३५ वर्षे असावी.
किती परीक्षा शुल्क लागेल?
बँक ऑफ इंडियामधील मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने हे शुल्क भरु शकतात.
अशी होईल निवड?
बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्ट किंवा इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.ही परीक्षा इंग्रजी किंवा हिंदी भाषेत होण्याचा पर्याय असेल.