जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२५ । गेल्या काही दिवसापासून सोने दरात चढ-उतार सुरु आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. मात्र यातच सोन्याच्या किमतीने मोठा डोंगर गाठला असून यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे डोळे पांढरे पडले आहे. दरम्यान आज आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव वाढले आहेत.

Good returns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज 10 मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी त्याची नवीनतम किंमत जाणून घेणे महत्त्वाचे आहे
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,065 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,520 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,650 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,970 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,376 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,797 रुपयांनी विकलं जात आहे.