जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२५ । जळवात मधील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून यामुळे उष्णतेच्या झळा आणि उकाड्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन दिवसात जळगावचे किमान आणि कमाल तापमान ५ अंशांनी वाढली आहे. यंदा मार्च सुरुवातीलाच जळगावचे तापमान पहिल्यांदा ३८ अंशापर्यंत पोहोचले. आगामी दिवसात पारा चाळीशी गाठू शकते.

गुरुवारी (दि ६ मार्च) किमान तापमान १० अंश तर कमाल तापमान ३३ अशांपर्यंत घसरले होते. मात्र गेल्या तीन दिवसात दिवसाचा आणि रात्रीचा पारा वाढला. रविवारी कमाल तापमान ३८ अंशार्यंत पोहोचले. दुसरीकडे रात्रीचे किमान तापमान १५ अंशापर्यंत पोहोचले. यामुळे रात्रीचा देखील गारवा कमी होताना दिसत आहे.
कमाल तापमानातील वाढीने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत.वाढते तापमाना आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. उकाड्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असल्याचे दिसत आहे. अशामध्ये जळगावात आज १० मार्चपासूनच काहीशी उष्णतेची तीव्रता वाढेल. कमाल तापमान ३९ ते ४० अंशांवर तर किमान तापमान १९ ते २१ अंशांपर्यंत राहिले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यात एक ते दोन अंश तापमान अधिक राहिल.