Yawal : प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामाचा भाचीवर तीक्ष्ण हत्याराने वार

मार्च 9, 2025 11:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२५ । लहानपणापासून सांभाळ केलेल्या भाचीने पळून जावून प्रेमविवाह केल्याने संतप्त झालेल्या मामाने केळी कापणीच्या धारदार शस्त्राने (बख्खी) तिच्यावर हल्ला केल्याची घटना यावल तालुक्यातील पिंप्री गावात घडली आहे. या हल्ल्यात भाची गंभीर जखमी झाली आहे.

crime 2 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार. यावल तालुक्यात पिंप्री हे गाव आहे. या गावात चेतन वासुदेव कोळी यांच्यासोबत लव्ह मॅरेज करून वैष्णवी विनोद तायडे (वय 18 )ही आली होती. गावात स्वप्निल सपकाळे याच्या घरात ती होती. दरम्यान शनिवारी सकाळी साडेआठ वाजता वैष्णवी तायडे या तरुणीचा मामा उमाकांत चंदू कोळी रा. पाडळसा ता.यावल हा आला आणि त्याने केळी कापण्याची बक्खी या तीक्ष्ण हत्याराद्वारे भाचीच्या गळ्यावर ठार मारण्याच्या उद्देशातून हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तर या हल्ल्यात वैशाली स्वप्नील सपकाळे ही देखील जखमी झाली.

नागरिकांनी दोन्ही महिलांची त्याच्या तावडीतून सुटका करून रुग्णालयात आणले. नागरिकांनी उमाकांत कोळी याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment