---Advertisement---
जळगाव जिल्हा

भुसावळमार्गे होळीसाठी उधना-मालदा टाउन विशेष एक्स्प्रेस धावणार ; ‘या’ स्थानकांवर असेल थांबा?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२५ । स्वस्त आणि आरामदायी प्रवासासाठी बहुतांश लोक रेल्वेनं प्रवास करतात. मात्र सणांच्या काळात घरी जाणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. अनेक वेळा तिकिटे न मिळाल्याने लोक घरी पोहोचू शकत नाहीत, अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेने होळीसाठी विशेष रेल्वे गाड्या चालविणायचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे होळीला घरी जाणाऱ्या लोकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. पश्चिम रेल्वेतर्फे उधना-मालदा टाउन-उधना विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन भुसावळ मार्गे धावणार आहे. दरम्यान, या गाडीला जळगावात थांबा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.

train 1 jpg webp

रेल्वे क्रमांक ०३४१८ उधना-मालदा टाउन ही विशेष रेल्वे ८ आणि २४ मार्च रोजी धावणार आहे. त्याचबरोबर ०३४१७ मालदा टाउन-उधना ही रेल्वे १६ मार्च आणि २२ मार्च रोजी धावणार असल्याचे जाहीर केले आहे.

---Advertisement---

०३४१८ ही ट्रेन उधना स्टेशनवरून दुपारी १२.३० वाजेल सुटेल. तर अमळनेर येथे सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी पोहोचले नंतर भुसावळ येथे सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटाने पोहोचले. तर मालदा येथे तिसऱ्या दिवशी पहाटे २ वाजून ५० मिनिटाला पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा?
चालठाणा, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, पाटणा, बख्तियारपूर, किउल, अभयपूर, जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर, कहालगाव, साहिबगंज, बरहरवा आणि न्यू फरक्का या स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment