जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२५ । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. जळगाव-भादली स्थानकादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील तरसोद-फागणे चारपदरी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जात आहे. या ब्लॉकमुळे दि. ५ ते ९ मार्च दरम्यान अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत हा उड्डाणपूल बांधला जात असून, त्यासाठी ५८ मीटर लांबीच्या गर्डरचे लाँचिंग करण्यात येणार आहे. यामुळे अप, डाऊन, तिसरी व चौथी लाइनवरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनाने विशेष पॉवर ब्लॉक घेतल्याने प्रवशांची गैरसोय होणार यामुळे प्रवाशांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
५ ते ९ मार्च दरम्यान या गाड्या उशिराने धावणार?
५ मार्च : गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ५५ मिनिटे, छपरा – सुरत एक्स्प्रेस ४५ मिनिटे, भागलपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ४५ मिनिटे, भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर २ तास.
६ मार्च रोजी लखनऊ – पुणे एक्स्प्रेस १ तास १५ मिनिटे, गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ५५ मिनिटे, छपरा-सुरत एक्स्प्रेस ४५, गुवाहाटी – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ४५ मिनिटे, भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर २ तास.
७ रोजी गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ५५ मिनिटे, भागलपूर -सुरत एक्स्प्रेस ४५ मिनिटे, दिब्रुगढ-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ४५ मिनिटे, भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर २ तास उशीराने धावेल.
८ रोजी अगरतला – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १ तास १५ मिनिटे, गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ५५ मिनिटे, छपरा-सुरत एक्स्प्रेस ४५ मिनिटे, भागलपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ४५ मिनिटे तर भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर २ तास उशिराने धावेल.
९ रोजी बरेली – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १ तास १५ मिनिटे, गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ५५ मिनिटे. छपरा-सुरत एक्स्प्रेस ४५ मिनिटे, पटना-वास्को दी गामा एक्स्प्रेस ४५ मिनिटे, भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर २ तास उशिराने धावणार आहे.