जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२५ । राज्यातील महायुती सरकारकडून महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविली जात असून या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. जानेवारी महिन्यापर्यंत पैसे महिलांना मिळाले आहेत. परंतु आता फेब्रुवारी महिना संपत आला असूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडला आहे.

दरम्यान, आता फेब्रुवारीचा हप्ता रखडल्याचे कारण आता समोर आले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
खरंतर, लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकांपूर्वी राबवण्यात आली आहे. जुलै २०२४ पासून जानेवारी २०२५ महिन्यापर्यंत पैसे महिलांना मिळाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात ८ व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा आहे. आज २६ तारीख आहे तरीही अजून पैसे खात्यात जमा न झाल्याने अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
लाडकी बहीण योजनेत पैसे लवकर येणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले होते. मी लाडकी बहीण योजनेच्या चेकवर सही करुन आलोय, असंही त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. परंतु तरीही अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, आता यामागचे कारण समोर आले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
याचसोबत लाडकी बहीण योजनेत पैसे न येण्यामागे अजून एक कारण असू शकतं. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच पैसे जमा होतील, असं सांगितलं आहे. त्यामुळे अजूनही पडताळणी पूर्ण झाली नसल्याचे दिसत आहे. यामुळे जेव्हा पडताळणी पूर्ण होईल त्यानंतरच पैसे दिले जातील. या योजनेत फेब्रुवारीचा हप्ता हा मार्च महिन्यातदेखील दिला जाऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे.