जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२५ । मार्च महिना हा २०२४-२०२५ आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असणार असल्यामुळे या महिन्यात तुमचं काही बँकेत काम असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्च महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार मार्च महिन्यात बँकांना तब्बल १३ दिवस बँका बंद असणार आहेत.यात होळी, ईद या सणांना सुट्ट्या असणार आहे. याचसोबत वीकेंडला सुट्टी असणार आहे.

मार्च महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी
२ मार्च २०२५
२ मार्च रोजी रविवार असल्याने बँका बंद असणार आहे.
७ मार्च
मिझोराम येथे चापचर कुट फेस्टिवल असल्याने बँका बंद असणार आहे.
८ मार्च २०२५
८ मार्च रोजी दुसरा शनिवार असल्याने देशभरातली सर्व बँका बंद असणार आहे.
९ मार्च २०२५
रविवार असल्याने सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.
१३ मार्च २०२५
होलिका दहन असल्याने उत्तर प्रदेश, केरळ, झारखंड आणि उत्तराखंडमधील बँका बंद असणार आहेत.
१४ मार्च २०२५
धुलिवंदन असल्याने देशभरातलील सर्व बँका बंद असणार आहेत. फक्त केरळ, कर्नाटक,ओडिशा आणि मणिपुरमधील बँका सुरु असणार आहेत.
१६ मार्च
१६ मार्चला सुट्टी असल्याने देशातील बँका बंद असणार आहेत.
२२ मार्च
बिहार दिवस असल्याने बिहारमधील सर्व बँका बंद असणार आहे. याचसोबत चौथा शनिवार असल्याने देशातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.
२३ मार्च
रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद असणार आहेत.
२७ मार्च २०२५
जम्मू काश्मीरमध्ये शब ए कद्र असल्याने बँक बंद असणार आहे.
२८ मार्च २०२५
जमात उल विदा असल्याने जम्मू काश्मीरमधील बँका बंद असणार आहेत.
३० मार्च २०२५
रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद असणार आहेत.
३१ मार्च २०२५
रमजान-ईद (ईद-उल फितर) असल्याने देशातील बँका बंद असणार आहेत.