जळगाव लाईव्ह न्यूज । फेब्रुवारी महिना (February Month) संपत आला असून सोबतच जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) तापमान वाढू लागले आहे. सध्या जिल्ह्यात तापमानाचा (Temperature) पारा ३५ अंशावर गेला असून उन्हाच्या झळा वाढू लागल्या असल्या. यामुळे पाणी टंचाईची (Water shortage) चिंता सतावू लागते. परंतु जळगावकरांना चिंता करण्याची गरज नाही. कारण गेल्यावर्षी पेक्षा यंदा जळगाव जिल्ह्यातील धरणातील जलसाठा समाधानकारक आहे.

खरंतर फेब्रुवारीपासून जळगाव जिल्ह्यात तापमान वाढू लागते. मार्च (March) महिन्याच्या सुरुवातीला तर सूर्य आग ओकू लागतो. उन्हाच्या वाढत्या तापमानाबरोबरच पाणी टंचाईची चिंता सतावू लागते. गेल्या २०२४ मध्ये उन्हाळ्याची सुरुवात होण्यापूर्वीच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. २०२४ मध्ये फेब्रुवारीत जिल्ह्यातील २१ गावांमध्ये २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती.
परंतु गेल्यावर्षी जून २०२४ महिन्यानंतर झालेल्या पुरेशा पावसामुळे यंदा जिल्ह्यातील धरणातील जलसाठा समाधानकारक आहे. जिल्ह्यात २०२४ वर्षात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली होती. विशेष जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण देखील १०० टक्के भरले होते. तर गेल्यावर्षी गिरणा धरणात ३३ टक्के साठा होता. यंदा मात्र ७५ टक्के साठा आहे, तर गेल्यावर्षी २१ फेब्रुवारी रोजी दोन प्रकल्पांत शून्य साठा होता. यंदा मात्र सर्वच प्रकल्पांत ५० टक्क्यांवर जलसाठा उपलब्ध आहे.
सध्या कोणत्या धरणात किती जलसाठा? (गेल्या वर्षीचा आणि चालू वर्षीचा )
हतनूर : २०२४- ८३.५३ टक्के …. २०२५- ८०.५९ टक्के
गिरणा : २०२४ -३३.३५ टक्के …. २०२५- ७५.८५ टक्के
वाघूर : २०२४ -८२.६२ टक्के …. २०२५- ८८.१२ टक्के
सुकी : २०२४ -८६.५१ टक्के …. २०२५- ८९.०१ टक्के
अभोरा : २०२४ – ८६.६८ टक्के …. २०२५- ८४.३५ टक्के
मंगरूळ : २०२४ – ७६.५९ टक्के …. २०२५- ६९.०७ टक्के
मोर : २०२४ – ८३.२५ टक्के …. २०२५- ८३.१७ टक्के
अग्नावती : २०२४ – १९.३६टक्के…. २०२५- ६१.०६ टक्के
हिवरा : २०२४ – ३१.२७ टक्के…. २०२५- ५४.८१ टक्के
बहुळा : २०२४ – ५१.१८ टक्के…. २०२५- ६८.२८ टक्के
तोंडापूर : २०२४ – ७४.५८ टक्के…. २०२५- ६६.०० टक्के
अंजनी : २०२४ – २५.९३ टक्के …. २०२५- ६२.६४ टक्के
गूळ : २०२४ – ८०.५१ टक्के …. २०२५- ७६.५४ टक्के
भोकरबारी : २०२४ – ०७.३६टक्के …. २०२५- १४.४५ टक्के
बोरी : २०२४ – २९.६१ टक्के…. २०२५- ५३.१७टक्के
मन्याड : २०२४ – ०० टक्के… २०२५- ६४.००टक्के
शेळगाव बॅरेज : २०२४ – ००टक्के…. २०२५- ६१.१६टक्के