---Advertisement---
राष्ट्रीय

अखेर युजवेंद्र आणि धनश्रीचा घटस्फोट ; कोर्टात सांगितलं विभक्त होण्याचं कारण..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२५ । भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघाचा स्टार क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Varma) यांच्यातील गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेल्या दोघांमधील घटस्फोटाबाबतची मोठी अपडेट समोर आलीय. लग्नाच्या 4 वर्षांनंतर युजवेंद्र – धनश्री यांचा घटस्फोट दोघांचा घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

yujuvendra chahal

न्यायालयात दोघांनीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.वकिलाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, घटस्फोटाच्या अंतिम सुनावणीसाठी आणि सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दोघेही गुरुवारी सकाळी 11.00 वाजल्यापासून कौटुंबिक न्यायालयात हजर होते. न्यायाधीशांनी दोघांनाही काउन्सलरकडे पाठवलं होतं. घटस्फोट घोषित करण्यापूर्वी हे सेशन तब्बल 45 मिनिटं सुरु होतं.

---Advertisement---

वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्तींनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात धनश्री आणि युजवेंद्र म्हणाले की, आम्ही परस्पर सहमतीने घटस्फोट घेत आहोत. अन्य प्रश्नांचं उत्तर देतनाना दोघे म्हणाले, गेल्या 18 महिन्यांपासून दोघे वेगळे राहत आहेत. सांगायचं झालं तर, परस्पर संमतीने घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये, जोडप्याला कमीतकमी एक वर्ष एकमेकांपासून दूर राहावे लागते, जे अशा प्रकरणांमध्ये घटस्फोटाचा आधार बनते.

घटस्फोटाचं कारण काय?
यावेळी धनश्री आणि युजवेंद्र यांनी वेगळं होण्याचं कारण देखील सांगितलं. कम्पॅटिबिलिटी संबंधी मुद्द्यांवरुन दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर न्यायाधीशांनी आपला निर्णय देताना सांगितले की, आजपासून दोघेही पती-पत्नी नसतील…, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीशांनी दुपारी 4.30 वाजता हा निर्णय दिला. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीशांनी गुरुवारी दुपारी 4.30 वाजता घटस्फोट झाल्याचा निर्णय दिल्याची देखील माहिती समोर येत आहे.

दरम्यान, दोघांच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून सतत दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री यांच्यात वाद असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. पण ही निव्वळ चर्चाच असावी असंच चाहत्यांना वाटत होतं परंतु आता दोघांचा घटस्फोट माहिती चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---