जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. यातच जळगावमध्ये दोन बस एकमेकाला घासल्या आहे. सुदैवाने मोठा अपघात टळला असून मात्र या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

काय आहे घटना?
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर स्मशानभूमी जवळ चोपडाकडून येणारी आणि जळगावकडून जाणारी एस.टी. बस समोरासमोर आली. मात्र सुदैवाने धडक टळली. तथापि, अपुऱ्या रस्त्यामुळे दोन्ही बस एकमेकांवर घासल्या गेल्या.
त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या या भागात रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रवाशांनी अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.