जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर तालुक्यातील बोहरा शिवारात एक कपाशीच्या शेतात मानवी कवटी व हाडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. परशुराम पोपट कोळी या ५५ वर्षीय व्यक्तीचे हे अवशेष आहेत, हे अंगावरील कपड्यांवरून समजले. मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नसून याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

परशुराम कोळी हे ३ ऑक्टोबर २०२४ पासून बेपत्ता होते व त्यांचा सर्वत्र शोध सुरू होता. रविवारी दुपारी महेंद्र धनगर यांच्या कपाशी शेतातील बांधावर ही कवटी व हाडे मिळाली.
याबाबत मारवड पोलीसांना माहिती देण्यात आली. त्यावेळी पोलीसांनी अंगावरील कपड्यांवर मयताची ओळख पटविली. नातेवाईकांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहे.