जळगाव लाईव्ह न्यूज । ऋषिकेश (Rishikesh), हरिद्वार (Haridwar) आणि मथुरेत जाऊन दर्शन घेणं हे प्रत्येक हिंदू बांधवाचं स्वप्न असतं. आता भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) माध्यमातून जळगावकरांच हे स्वप्न पूर्ण होणार आहे. मथुरा (Mathura), आग्रा, ऋषिकेश, हरिद्वारला जाण्यासाठी विशेष रेल्वे उपलब्ध आहेत. जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना भुसावळ स्थानकावरून (Bhusawal Railway Station) यात्रा करता येणार आहे.

यापूर्वी भुसावळ स्टेशनवरून योग नगरी ऋषिकेशसाठी थेट ट्रेन नव्हती. मात्र रेल्वेनं ट्रेन क्रमांक ०७३६३/०७३६४ हुबळी-योग नगरी ऋषिकेश-हुबळी विशेष ट्रेन सुरु केली आहे. सध्या दर मंगळवारी भुसावळ स्थानकांवर सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी ही गाडी उपलब्ध होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता ही ट्रेन ऋषिकेशला पोहोचेल
या स्थानकांवर ट्रेन थांबेल
धारवाड, लोंडा, बेळगाव, घाटप्रभा, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बीना, वीरंगना लक्ष्मीबाई झांसी, ग्वाल्हेर, आग्रा कॅन्ट, मथुरा, हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद, मेरठ शहर, मुझफ्फरनगर, देवबंद, टपरी, रुरकी, हरिद्वार आणि ऋषिकेश.
तिकीट दर किती?
भुसावळहुन ऋषिकेशचे स्लीपरचे तिकीट दर 755, तर थर्ड एसीचे 1930, सेकंड एसीचे 2680 रुपये इतके तिकीट दर आहेत.