जळगाव लाईव्ह न्यूज । तरुणींना प्रेमजाळ्यात ओढून त्यांना लग्नाचे आमिष देऊन त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना रावेर तालुक्यातून समोर आलीय. लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार करून गर्भवती केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

रावेर तालुक्यातील एका गावात २० वर्षीय तरूणीला संशयित आरोपी अजय बळीराम साळवे याने लग्नाचे आमिष दाखवत नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२४ च्या कालावधीत वेळोवळी अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत तरूणी ही गर्भवती राहली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर पिडीत तरूणीने निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.
त्यानुसार संशयित आरोपी अजय बळीरा साळवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी संशयित आरोपीला अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे हे करीत आहे.